दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड 

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जी मुळे एका महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारने हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना रद्द करून सर्व जमीन सरकारच्या ताब्यात घ्यावी व हॉस्पिटल बंद करण्यात यावे, तसेच हॉस्पिटल प्रमुख आणि संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, असे मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महा नगराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, उपाध्यक्ष गणेश चराहाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल धन दांडग्यांचे हॉस्पिटल आहे. श्रीमंता शिवाय सामान्य माणसाला तिथे उपचार मिळत नाहीत, फेब्रुवारी मध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे, यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. दिलेल्या जमिनीची किंमत कमीत कमी दहा कोटी रूपये आहे, तरिही गरीब रुग्णांना उपचार मिळत नाही.

भिसे नावाच्या गरोदर महिलेचा उपचारा अभावी मृत्यू झाला, हॉस्पिटलच्या हलगर्जी मुळे एका महिलेचा मृत्यू झाला, त्यास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे, त्यामुळे या हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना रद्द करून सर्व जमीन सरकारच्या ताब्यात घेऊन, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर दिले जाईल, यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें