वाघोली नगरीत ‘श्रीराम जन्मोत्सव’ उत्साहात साजरा

लोणीकंद प्रतिनिधी

वाघोली ता.हवेली, श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करून भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला, सकाळी श्रीरामांची अभिषेक पूजा, मंत्रोच्चार, आणि महाआरतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. दुपारी श्रीराम जन्मसोहळा पार पडला.

श्रीराम जन्माच्या वेळी “जय श्रीराम” च्या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत उपस्थिती दर्शवली. दर्शनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

या उत्सवाचे आयोजन श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांचा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग लाभला. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता, राम नवमीच्या निमित्ताने वाघेश्वर मंदिर ते फुलमाळा रोडवरील सोसायट्यांपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, पालखी, भगव्या पताका आणि भजन-कीर्तनाच्या गजरात ही यात्रा भव्यतेने पार पडली. या यात्रेत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, संपूर्ण उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें