लोणीकंद गावचे ग्रामदैवत ‘श्री म्हसोबा महाराज’ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

लोणीकंद :(ता.हवेली) सालाबादप्रमाणे लोणीकंद गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज देवाचा उत्सव, मिती चैत्र, शुद्ध सप्तमी, शके १९४७, शुक्रवार दि.०४ ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली, यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव पंच कमिटी व ग्रामस्थांनी केले होते .

 श्री म्हसोबा महाराज यात्रा ही गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे, हजारो भाविकांनी यात्रेला हजेरी लावली, यात्रेच्या पहिल्या दिवशी श्रींची महापुजा व अभिषेक, धार्मिक विधी कार्यक्रम झाले, दिवस भर बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या, रात्री श्रींच्या पालखीची मिरवणूक, व छबिना तसेच मारूती मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लावण्य मदन मंजिरी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला, व रात्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला, यासाठी तमाशा रसिक प्रेमींनी तमाशाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती,

यात्रेच्या आखाड्यात मॅटवर नामांकित पहिलवानांच्या निकाली कुस्त्या झाल्या, यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्रीरामनवमी निमित्त ह.भ.प. उत्तम महाराज बडे यांचे सुश्राव्य किर्तन झाले, आणि उर्वरित राहिलेल्या बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या, पंचक्रोशितील असंख्य नागरिकांनी उत्सावात उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रामाचा आनंद घेतला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें