न्हावरेच्या श्री मल्लिकार्जुन हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत मारली बाजी…

न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे ३ विद्यार्थी एन.एम. एम.एस.राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक तर १४ विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एन. सानप यांनी दिली.

विद्यालयातील सृष्टी नवनाथ बिडगर(१२७ गुण), अजय अंकुश तांबे (११४ गुण), नितीन राहुल तांबे (१०२ गुण ) हे तीन विद्यार्थी एन.एम.एम.एस.राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना वर्षाला १२,००० रुपये याप्रमाणे चार वर्षात प्रत्येकी ४८,००० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

सारथी शिष्यवृत्तीसाठी – पवार पियुष प्रल्हाद (९६ गुण), खंडागळे श्रावणी अमोल (९३ गुण), कोकडे पृथ्वीराज रवींद्र (९० गुण), वाघचौरे साक्षी विष्णू (८९ गुण), खंडागळे श्रेयश सचिन (८९ गुण), काळे तनिष्का बापू (८७ गुण),कोरेकर कृष्णा राजेंद्र (८१ गुण), मारणे कीर्ती अण्णा (८० गुण), ढोरजकर संजीव शरद (७९ गुण), कोकडे आर्या अशोक (७८ गुण), कोकडे सिद्धेश कृष्णा (७८ गुण), गिरमकर आदर्श नवनाथ (७५ गुण), शितोळे देवयानी विजय (७२ गुण), साळुंके रोहन आबासाहेब (७२ गुण), हे विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना वर्षाला ९६०० रूपये याप्रमाणे चार वर्षात प्रत्येकी ३८,४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे एन.एम.एम.एस.प्रमुख श्री अनंत वाघमोडे सर,श्री दिनेश शेलार सर,श्री तुषार गायकवाड सर,श्री दिपक गोरडे सर यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एन. सानप,पर्यवेक्षक श्री बी.एस.जाधव,ज्येष्ठ शिक्षक जे.डी.जाधव सर तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें