सरपंच मोनिका कंद यांना ‘कर्मयोगी ग्राममर्मी’ पुरस्कार प्रदान

लोणीकंद: ग्रामगौरव मीडिया अ‍ॅण्ड फाऊंडेशन तर्फे अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र शाखा तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ग्राम विकासाच्या वारकर्‍यांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राममर्मी सन्मानाने लोणीकंद ता. हवेली गावच्या विद्यमान सरपंच मोनिका श्रीकांत कंद यांना ‘कर्मयोगी ग्राममर्मी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या सुरेखा कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पूजा कंद, उपसरपंच अतुल मगर, ग्रा.सदस्या सरस्वती दळवी, सोनाली जगताप, कावेरी कंद, सुजाता कंद, शिंदे सर, ग्रामविकास अधिकारी बोरावणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार दि.३ एप्रिल रोजी पुण्यातील स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंचाच्या भव्य दालनात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, उत्कृष्ट कामाबद्दल सरपंच मोनिका कंद यांना ‘ग्राममर्मी’ म्हणून आकर्षक सन्मानचिन्ह, भारताचे संविधान, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता, एक वडाचे रोपटे देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. मोनिका कंद यांना ‘कर्मयोगी ग्राममर्मी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल लोणीकंद ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें