शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वाजेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, संचालक मंडळ निवडणूक सन २०२५ ते सन २०३० पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया सुरु आहे, दि. २४ ते २८ मार्च दरम्यान १३ जागांसाठी ४५ उमेदवारांचे नामनिर्देश पत्र दाखल झाले असून १ एप्रिल रोजी नामनिर्देश पत्राची छाननी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक अर्ज बाद झाला असून ४४ अर्ज वैध ठरले आहेत.
पुणे आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी पुणे ग्रामीण आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने सदस्यांची निवड करण्याच्यासाठी निवडणुक प्रक्रिया जाहीर केली आहे, असून निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळ यांनी दि.२१ मार्च २०२५ रोजी परिपत्रक जारी केले आहे.
उमेदवारांना आपले नामनिर्देश २ ते १६ एप्रिल या कालावधीत मागे घेता येणार आहे, १७ एप्रिल रोजी चिन्ह वाटप होणार असून २७ एप्रिल २०२५ रोजी निवडणुक होणार असून निवडणुका संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.