लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न…

प्रशासना कडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तम मार्गदर्शन… 

प्रशासनास नेहमी सहकार्य करण्यात येईल; पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांची ग्वाही

लोणीकंद: दि.२६, रोजी पुणे, येरवडा विभागाच्या मा.डि.वाय.एस.पी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांचे पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्य यांची विचार विनिमय तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे यांनी दिली.

यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील,व शांतता कमिटी सदस्य तसेच लोणीकंद लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य त्याच बरोबर हिंदू व मुस्लिम बांधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पोलीस ठाण्याच्या झालेल्या या बैठकीमध्ये प्रथमतः सर्व सदस्य व पोलीस पाटील यांचा परिचय करून पुढील चर्चे सुरुवात केली, त्यामध्ये भविष्यात येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या धर्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरा होणार असून यासाठी शांतता राखणे कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी डि.वाय.एस.पी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी आलेल्या सर्व पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांना योग्य चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांनी भविष्यात येणाऱ्या धार्मिक सामाजिक सण-उत्सव यासाठी शासनास व पोलीस प्रशासनास शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांनी नियोजित बैठकीमध्ये दिली, सर्व पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांनी व पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी एकमेकांना गुढीपाडवा व रमझान ईद निमित्ताने शुभेच्छा देऊन या बैठकीची सांगता करण्यात आली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें