स्वराज्यरक्षक छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी साजरी..

देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था  महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्त शंभूराजे जन्मस्थळ, किल्ले पुरंदर वरून बुधवार दि.२६ रोजी प्रस्थान झालेल्या पालखीचे शनिवारी (दि.२९)रोजी बलिदान,समाधीस्थळ श्रीक्षेत्र तुळापूर व वढू बुद्रुक येथे आगमन झाले, पादुका पूजन, आरती, शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी व त्यानंतर आरतीनंतर सोहळा संपन्न झाला,

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी तुळापूर व वढू बुद्रुक येथील त्यांच्या समाधीस्थळाचे पूजन करून नतमस्तक होत पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला या वीर पराक्रमी योद्ध्याला विनम्रपणे अभिवादन केले, तसेच कवी कलश यांच्या समधीचेही याप्रसंगी पूजन करून त्यांचेही दर्शन घेतले.

महाराजांची शौर्यगाथेला मानवंदना करून नतमस्तक होण्यासाठी शिरूर हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर कटके, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, पै. संदीप भोंडवे, पुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे सोमनाथ भंडारे, आदी ग्रामस्थ यांच्यासह राज्याच्या काना कोपऱ्यातून तमाम शिव-शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें