भैरवनाथ तालीमची दहिहंडी फोडताना चिपळुन येथील गोविंदा पथक(छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर प्रतिनिधी संदीप डोके
कोंढवा दि.८ येथे राम बोलो भाई,बोल बजरंग बल्ली कि जय , गोविंदा आला रे आला त्यातच पावसाची रिमझिम डिजेच्या तालावर तरुणाईने धरलेला ठेका अशा चैतन्यमय वातावरणात कोंढवा खुर्द येथील आई प्रतिष्ठाण व भैरवनाथ तालीम दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी गोविंदांनी फोडली
आई प्रतिष्ठानच्या वतिने दहिहंडी फोडनार्या गोविंदा पथकास ट्रॉफी देताना माजी आमदार महादेव बाबर(छाया:संदिप डोके हडपसर)
कोंढवा खुर्द येथील आई प्रतिष्ठाणच्यावतिने माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पै प्रसाद महादेव बाबर यांनी ७७७७७७ रुपयांचे दहिहंडी बक्षीस ठेवण्यात आले होते तर भैरवनाथ तालीम मंडळाच्या वतिने बाळासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिहंडी उत्सव समिती अध्यक्ष सौरभ लोणकर यांनी ४४४४४४ रपयांचे दहिहंडी बक्षिस ठेवले होते लाखोच्या बक्षिसांची उधळ पहाण्यासाठी गोविंदा भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती चिपळुन येथील संत तुकाराम प्रतिष्ठाणच्या गोविंदा पथकाने थरावर थर देत दोन्ही हंड्या फोडल्या
आई प्रतिष्ठाणच्या दहिहंडी मध्ये माजी आमदार महादेव बाबर,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पै प्रसाद बाबर,माजी नगरसेवक तानाजी लोणकर,भरत चौधरी ,मेघा बाबर,शाखाप्रमुख सचिन भाऊ कापरे,राजेंद्र बाबर,शंकर लोणकर, अमर कामठे ,शंकर लोणकर आदी उपस्थित होते माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते दहिहंडी पथकाला बक्षिस देण्यात आले तर भैरवनाथ तालीम दहिहंडी उत्सवात मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,बाळासाहेब कामठे,माजी नगरसेविका आरती बाबर,सुप्रिया शिंदे,अमोल शिरस,सतिश शिंदे ,संजय लोणकर,प्रकाश काटे,सुरज लोणकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोविंदा पथकाला बक्षिस देण्यात आले.