अशोक पवार यांना शिरूर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ; प्रकाश धारिवाल

ता.११/११/२४

शिरूर; विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरामध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती, शिरूर नगरीचे भूषण प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य काढलेल्या प्रचार रॅलीला शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्यासोबत प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारिवाल तसेच शहारातील सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी वर्ग, डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या रॅलीला संबोधित करताना श्रीमान प्रकाशशेठ धारिवाल यांनी धारिवाल परिवार आणि पवार परिवाराचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. याच स्नेह संबंधातून २००७ पासून पवार परिवार नगरपालिका निवडणुकीत सातत्याने आमच्या बरोबर आहे आणि धारिवाल परिवार देखील २००९ पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अशोक बापूंच्या पाठीशी उभा आहे, असे आमचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी अशोक बापूंना शिरूर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचे सांगितले.

माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, माजी नगरसेविका रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे, माजी नगरसेवक संजय देशमुख यांनी देखील शिरूर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या अध्यक्षांनी शिरूर हवेलीच्या विकासासाठी आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें