समतानगर येथे ड्रेनेजचे खचलेले झाकण (छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर प्रतिनिधी संदीप डोके
कोंढवा खुर्द येथील समतानगर भागामध्ये ड्रेनेजची झाकणे खचल्याने तसेच ड्रेनेज मध्ये घाण अडकल्याने घाण पाणी नागरीकांच्या घरामध्ये जात असल्याने येथील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेजचे घाण पाणी नागरीकांच्या घरात जात असल्याने परीसरात दुर्गंधी पसरली आहे मात्र संबंधित प्रशासन याकडे डोळे बंद करुन बसली आहे एखादा मोठा साथीचा आजार झाल्यावर प्रशासन लक्ष देणार का?असा संतप्त सवाल स्थानिक नागरीकांनी केला आहे.
समतानगर येथे ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असुन येथील गेल्या १५ ते २० वर्षापूर्वी समतानगर येथे ड्रेनेज लाईन टाकण्यात आले होते त्यानंतर कोणीही या भागातील लाईन बदललेले नाही त्यामुळे ड्रेनेज लाईनचे पाणी लोकांच्या घरांमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे वेळेत प्रशासनाने लक्ष घालून समता नगर मधील बदलून द्यावे अशी नागरिकाकडून मागणी करण्यात येत आहे अन्यथा प्रशासनाचे विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरीक समाजसेवक उत्तरेश्वर शिंदे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.