Home पुणे ग्रामीण शिरूर मधून प्रदीप कंद यांची निवडणूकीतून माघार;माऊली कटके विरुद्ध अशोक पवार यांच्यात लढत

शिरूर मधून प्रदीप कंद यांची निवडणूकीतून माघार;माऊली कटके विरुद्ध अशोक पवार यांच्यात लढत

0
शिरूर मधून प्रदीप कंद यांची निवडणूकीतून माघार;माऊली कटके विरुद्ध अशोक पवार यांच्यात लढत

ता. ४ शिरूर विधानसभेची जागा वाटपात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली, त्यामुळे भाजपचे इच्छुक असलेले प्रदीप कंद यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव  निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून अखेर अर्ज मागे घेतला त्यामुळे शिरूर- हवेलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात दुरंगी लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांना अर्ज माघारी घेण्याची सूचना फोनवर दिल्याने तसेच चांगल्या पदावर संधी देण्याची ग्वाही दिल्यामुळे कंद यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करुन आपला अर्ज माघारी घेतला व महायुती धर्म पाळणार असल्याचे कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रदीप कंद यांच्यासह कटके मनिषा ज्ञानेश्वर, शिवाजी ज्ञानदेव कदम, प्रकाश सुखदेव जमधडे, सुरेश लहानु वाळके, जगदीश भागचंद पाचर्णे, भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, पंढरीनाथ मल्हारी गोरडे, शांताराम रंगनाथ कटके, शिवाजी किसन कुऱ्हाडे, दाभाडे गणेश कुंडलिक यांनी देखील माघार घेतली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी नोटीसीद्वारे जाहीर केले.