हवेली, संभाजी ब्रिगेड १९८ शिरूर विधानसभा लढवणार आहे, संभाजी ब्रिगेड च्या राज्यकार्यकारिणी च्या बैठकी मध्ये पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष व शिरूर विधानसभा निवडणुक प्रमुख चंद्रशेखर घाडगे यांनी प्रस्ताव मांडला आला आहे,
शिरूर विधानसभा मधील मतदारांना आमदार म्हणुन तरुण आणि नवीन चेहरा हवा आहे,संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दहा वर्षांपासून सामाजिक व राजकीय काम करण्यात येत आहे, लोकांच्या हितासाठी अनेक आंदोलने संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहेत, अनेक तरुण व ज्येष्ठ नागरिक हक्काने काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांना संपर्क करतात,अनेक महिलांचे प्रश्न असतील, अन्याय झालेले व्यक्ती असतील यांना न्याय देण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे,
मराठा आरक्षणाचा लढा संभाजी ब्रिगेड तीस वर्षांपासून लढत आहे, त्या लढ्यात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे, ना सत्ता ना आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तरी सुद्धा सर्व सामान्याना काम करणारा आणि आपला काम करणारा भाऊ वाटतो म्हणुन सर्वसामान्य आशेने काम घेऊ, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यांच्याकडे येतो, संभाजी ब्रिगेड शिरूर हवेली विधानसभा जनतेसाठी लढत आहे,
पुणे नगर रोड परिसरातील वाहतुक कोंडीतून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी व बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी, गावोगावी रस्ता हा चांगल्या दर्जाचा देण्यासाठी, लढवणार आहे,
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात जिजाऊ सृष्टी, शिवसृष्टी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, उभा करणार आहे, तसेच जिल्हापरिषद शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी काम करण्यासाठी संभाजी ब्रिगेड शिरूर हवेलीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, २०१९ साली ताकत मर्यादित होती पण आता शिरूर हवेली मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक जिल्हापरिषद गटात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, इतर पक्षांनी संभाजी ब्रिगेडला हलक्यात घेऊ नये, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला, तरुणांना एकत्र घेऊन संभाजी ब्रिगेड निवडणुक लढवणार आणि जिंकणार आहे, फॉर्म भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिरूर हवेली विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेडचे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे हे संभाजी ब्रिगेडचा उमेदवार म्हणुन शक्तिप्रदर्शन करून फॉर्म भरणार आहेत, अशी माहिती जिल्हा सचिव निलेश ढगे यांनी दिली,