शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील हरिमामा फराटे यांनी पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात वर्षभर विविध योजना, उपक्रम राबवून उल्लेखनिय काम केले याची दखल घेत तसेच यापुढेही जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळावी यासाठी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सचिन निवंगणे यांनी हरिमामा फराटे यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली हा निवडीचा कार्यक्रम पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालन सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी पुणे जिल्हा कॅट चे अध्यक्ष विकास मुंदडा, पुणे शहराध्यक्ष अजित चंगेडिया, पुणे जिल्हा महासचिव नवनाथ सोमसे, पुणे शहर महासचिव दत्तात्रय जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष रिजवान खान, शशिकांत थोरात श्रीकृष्ण भोसले ऋषिकेश मस्तुद यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, निवडीनंतर सर्वांनी हरीमामा फराटे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कॅट संघटनेमध्ये आठ कोटी व्यापारी व साठ हजार छोट्या मोठ्या व्यापारी संघटना असून संघटना अधिकाधिक बळकट करण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचणार आहे, शिरूर ग्रामीण भागातील तालुका कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर मांडवगण येथुन संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरवात करून किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिला तसेच यापुढेही जिल्हा पातळीवर जोमाने काम करून व्यापारी वर्गातील समस्या असणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हरीमामा फराटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.