Home पुणे ग्रामीण हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलाचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न

हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलाचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न

0
हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलाचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न

जनतेसाठी अजूनही विकासकामे करीत राहणार – शिवाजी आढळराव पाटील

हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळालेल्या व शिरूर लोकसभेचे माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून २१ कोटी,६८ लाख,५५ हजार निधीचे मंजूर झालेल्या भव्य पुलाचा भूमिपूजन शुभारंभ माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी संचालक प्रदिप कंद, भाजपचे क्रीडा प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे, यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा नियोजन समितीचे अलंकार कांचन पाटील,जिल्हा नियोजनचे सदस्य प्रवीण काळभोर,शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे हवेली तालुका प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य वीज महावितरण समितीचे सदस्य विपुल शितोळे,भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे,हिंगणगावचे सरपंच सागर थोरात,पेरणेचे सरपंच दशरथ वाळके,मिरवडीचे सरपंच प्रवीण कोंडे,माजी सरपंच सागर शेलार,शिंदेवाडीचे सरपंच संदिप जगताप,खामगाव टेकचे सरपंच मारुती थोरात,शिवसेना उपजिल्हा प्रमुख शामराव माने,यशवंतचे संचालक कोंडलिक थोरात,हिंगणगावच्या उपसरपंच रुपाली गायकवाड,सांगवी सांडसचे सरपंच शांताराम पाबळे,शशिकांत चौधरी,विजय चौधरी, कंत्राटदार पडवळ, आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या हवेली व दौंड तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेक सह तालुक्यातील दळणवळण वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पूर्व हवेली परिसरातील हिंगणगाव तसेच शेजारील गावांतील ग्रामपंचायत शिष्टमंडळांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी मागणी केली असता मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाल्याने या पूर्व हवेली तालुक्यातील २५ गावांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. 

 मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलामुळे महत्वाच २५ गावच्या वाहतुकीचा प्रश्न मिटणार असून दळणवळणास मोठी चालना मिळणार आहे.यामुळे या हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील खामगाव टेक,हिंगणगाव,टिळेकर वाडी,शिंदेवाडी,जगतापवाडी, मिरवडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस, उरुळी कांचन, यासारख्या व दौंड तालुक्यातील अनेक गावांना पुढील काळामध्ये डेव्हलपमेंट साठी मोठी संधी मिळणार आहे.या पुल उभारणीसाठी माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील यांनी खरे प्रयत्न केले असल्याचे प्रदिप कंद यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यापुढे या भागात वर्दळ वाढून दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने आम्हालाही यात आनंद आहे.अशीच विविध प्रकारे अनेक विकासकामे अजूनही जनतेसाठी करीत राहणार असल्याचे आश्वासन हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणारा या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ सभेत माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित जनतेला दिले या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल हिंगणगाव व परिसरातील सर्व गावचे आजी, माजी, सरपंच, सदस्य, विविध पदाधिकारी यांचे आढळराव पाटील यांनी कौतुक करून अभिनंदन केले.हिंगणगाव येथे सभा पार पडली सूत्रसंचालन काळूराम थोरात यांनी केले व आभार हरिभाऊ शिंदे यांनी मानले.