महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडे बोल्हाई तालुका हवेली येथील बोल्हाई देवीच्या नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ करण्यात आला.
श्रीराम प्रभु वनवासामध्ये असताना पार्वती मातेने सीतामाईचे रूप घेऊन श्रीरामांसमोर प्रगट झाल्या, प्रभू रामचंद्रांनी बोलाआई म्हणून पार्वती मातेला ओळखले म्हणून या स्थानाला व देवीला बोल्हाई असे नाव पडले अशी येथील आख्यायिका आहे नवरात्र मध्ये विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवीचे मुख्य पुजारी रवीमहाराज गाडेकर यांनी केले आहे