Home ताज्या बातम्या बाभुळसर बू!येथे महात्मा गांधीं जयंती निमित्त स्वच्छता अभियान

बाभुळसर बू!येथे महात्मा गांधीं जयंती निमित्त स्वच्छता अभियान

0
बाभुळसर बू!येथे महात्मा गांधीं जयंती निमित्त स्वच्छता अभियान

शिरूर प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी

ता. २ शिरूर तालुक्यातील बाभुळसर येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली, आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामास्थांनी ग्रामपंचायत परीसर झाडून स्वच्छ केला.

महान नेते महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानासाठी त्यांचे स्मरण केले जाते. अहिंसक आणि प्रामाणिक वर्तन करणारा नवीन समाज निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

यावेळी मा.सरपंच गणेश मचाले, उपसरपंच मोहिनी रणदिवे, सदस्या मनीषा नागवडे, रामराव पाटील, हरिभाऊ नागवडे, महेंद्र नागवडे, सोमनाथ नागवडे, महेंद्र रणदिवे, हनुमंत खंडेराव नागवडे, सुरेश नागवडे, मारुती नागवडे,अरुण उबाळे, ग्रामविकास अधिकारी उत्तम गायकवाड, अमित नागवडे, संतोष भंडलकर, सागर नागवडे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.