निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) हद्दीतील चासकमान डावा कालवा वरील बांधकाम केलेला सिमेंटचा पुल कुठलीही परवानगी न घेता पुल तोडून सदर चारी बुजवून त्यामध्ये पाण्याच्या नळ्या टाकून अतिक्रमण करणाऱ्यावर शिक्रापूर येथील चासकमान कालवा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीने लेखी पत्र देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशी माहिती सरपंच बापूसाहेब काळे यांनी माध्यमांना दिली
निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार चासकमान डावा कालवा मधील डी.वाय. १३ मायनर ७ च्या वरील निमगाव म्हाळुंगी हद्दीतील ग्रामपंचायतीने बांधकाम केलेला सिमेंटचा पुल कुठलीही व कोणाचीही परवानगी न घेता सदर पुल तोडून तसेच सदर चारी बुजवून त्यामध्ये पाण्याच्या नळ्या टाकून अतिक्रमण सुरु असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता ग्रामस्थांनी वरील विषय सरपंच बापूसाहेब बबनराव काळे व ग्रामविकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिला सदर माहिती मिळाल्यानंतर तत्काळ सरपंच यांनी ग्रामस्थांसमवेत पाहणी करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी पस्तीस वर्षापूर्वीचा सदर चारीवरील पुल तोडण्यात आलेला दिसला व सदर चारी बुजवून चारी मध्ये पाण्याच्या नळ्या टाकून सदर चारी बुजवण्यात आली
यावेळी सदर ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तीला सदर काम करण्यासाठी शासनाची परवानगी घेण्यात आली आहे का असे पत्र दाखवा असे सरपंच यांनी विचारले असता सदर व्यक्तीनेअसे कुठल्याही प्रकारचे पत्र नाही असे सांगितले. त्यामुळे सदर काम बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्याने व यामुळे निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांची शेताच्या पाण्याची व पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊन खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांनी केली आहे.