Home पुणे ग्रामीण मांडवगण फराटा येथे घोडगंगा कारखाना संदर्भात किसान क्रांतीची पत्रकार परिषद

मांडवगण फराटा येथे घोडगंगा कारखाना संदर्भात किसान क्रांतीची पत्रकार परिषद

0
मांडवगण फराटा येथे घोडगंगा कारखाना संदर्भात किसान क्रांतीची पत्रकार परिषद

शिरूर प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी

ता. २९ शिरूर तालुक्याची कामधेनू असलेली घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची २० सप्टेंबर २०२४ रोजी ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सभासदांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तर न देता सभा गुंडाळण्यात आली घोडगंगा सुरू करण्यासाठी किसान क्रांती संघटनेच्या वतीने शिरूर तालुक्यात घोडगंगा बचाव पदयात्रा काढली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

घोडगंगा बचावासाठी पदयात्रा; रवी बापू काळे 

कोजन प्रकल्पातून कारखान्याला ७५ कोटीची विज तयार होते सध्या घोडगंगा कारखाना दोन वर्षे बंद असून अशोक पवार सातत्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर सातत्याने ताशेरे ओढले जातात, त्याचबरोबर घोडगंगा कारखान्याला २९० कोटीची देणी आहे तसेच अशोक पवार यांनी मार्च २०२३ मध्ये नवीन सभासद करण्यासाठी तीस हजार रुपये घेण्यासाठी ठराव केला परंतु घोडगंगा प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही त्यामुळे कारखान्याला ६४ कोटीचा तोटा झाला तसेच कारखान्याला NCDC कडून १९० कोटीची मागणी केल्यास त्यासाठी फक्त १०७ कोटी मिळू शकते तसेच अशोक पवार यांनी वारंवार शरद पवार यांच्याबरोबर गेल्याने माझ्यावर राज्य सरकार कडून घोडगंगा कारखान्याला कर्ज देण्याचे टाळत आहे, तसेच मंत्री समितीमध्ये अजितदादा सदस्य नसताना दादांनी कर्ज देणे संदर्भात अन्याय केल्याचे पत्रकार परिषदेत शिरूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

घोडगंगा बचावसाठी चर्चा करण्यासाठी तयार; सुधीर फराटे

घोडगंगाच्या प्रश्नांविषयी कधीही बैठकीत बसण्यासाठी अशोक पवार यांनी १९ संचालक व कार्यकारी संचालक सहित घोडगंगा बचावसाठी आपण चर्चा करण्यासाठी तयार आहोत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अजितदादांचे वर्चस्व असताना व्यंकटेश कृपाला ३०० कोटींचं कर्ज मिळाले, मग घोडगंगा कारखान्याला पी डी सी सी बँकेमार्फत कर्ज देता आले असते का नाही? बँक धोरणानुसार कर्ज मिळण्याची पथ मर्यादा कारखान्याकडे शिल्लक नसल्याने पिडीसीमार्फत कर्ज देता आले नाही १ ऑक्टोबर २०२४ रोजी वडगाव रासाई येथे किसान क्रांती पदयात्रा मुक्कामी असून या ठिकाणी सर्व संचालक सहित उपस्थित राहावे असे सुधीर फराटे यांनी आव्हान केले

अशोक पवार यांनी घोडगंगा कारखान्याबरोबर बंद करताना अनेक संस्थांमध्ये शेतकऱ्यांची कामधेनु वरदकृपा डेअरी उद्योग समूह, शिरूर तालुक्यातील डॉक्टरांची धन्वंतरी पतसंस्थाचा कारभार थांबवण्यात यशस्वी ठरले तसेच जिजामाता सहकारी बँक १५ वर्षापासून ठेवीदार असलेले सभासद त्यांना कर्ज डावलून फक्त जवळच्या व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्यात येत होते. आपल्या व्यंकटेशच्या शैक्षणिक संकुलामध्ये मुले येण्यासाठी वाबळेवाडी शाळेला बदनाम करण्याचे कारस्थान अशोक पवार यांनी केल्याचे शिरूर तालुक्यातील जनतेसमोर उघड झाले आहे. तसेच विकास सोसायटीमध्ये जवळच्या असणाऱ्या बगल बच्चांमार्फत सोसायटीमध्ये कुरघोडी करण्याचे कारस्थान सध्या चालू असल्याचे सुधीर फराटे यांनी सांगितले

वीज प्रकल्प करारातून कारखान्याला तोटा; बाबासाहेब फराटे 

घोडगंगाच्या पदयात्रेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, मागील काळात मी अशोक पवार यांच्याबरोबर काम करत असताना आम्हा सर्व संचालकांना विश्वासात घेऊन इतर कोजन प्रकल्पाला ८२ कोटीची मान्यता मिळवली असून त्यास फक्त आपणांस १५ कोटीचा खर्च करावा लागेल ,बाकी सर्व अनुदानित आहे असे आम्हाला सांगण्यात आले ,त्यावेळी आमदार अशोक पवार यांच्या खोटे आश्वासनाला बळी पडून या प्रकल्पाला मंजूर घेतली, अशोक पवार यांनी वीज प्रकल्पातून महावितरण कंपनीला ६ रुपये ४० पैसे युनिट घेण्याऐवजी ४ रुपये ९९ पैसे युनिट ने करार केल्याने कारखान्याला तोटा झाला असल्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी रवी बापू काळे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका, सुधीर फराटे मा. संचालक घोडगंगा साखर कारखाना, बाबासाहेब फराटे मा. व्हाईस चेअरमन घोडगंगा साखर कारखाना, लक्ष्मण बापू फराटे मा. सदस्य पंचायत समिती शिरूर, प्रभाकर अण्णा घाडगे मा. चेअरमन मांडवगण फराटा वि का,अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते, सतीश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया शिरूर तालुका, बिभिषन फराटे यांच्यासह कारखाना सभासद, मांडवगण फराटा ग्रा. सदस्य आदी उपस्थित होते.