Home ताज्या बातम्या राजभवन येथे शिवस्मारक उभारण्याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

राजभवन येथे शिवस्मारक उभारण्याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

0
राजभवन येथे शिवस्मारक उभारण्याच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

पुणे, राजभवन येथे शिवस्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड मनोज दादा आखरे व महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी पुणे येथील मेळाव्यात राजभवन येथे शिवस्मारक उभारावे अशी घोषणा केली होती, त्या मागणीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून या मोहीमेची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करण्यात आली

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिरूर लोकसभा अध्यक्ष संदीप मुंगसे, मावळ लोकसभा अध्यक्ष दिनकर केदारी, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिराजदार, संघटक अंकुश हाके, संतोष सुर्यवंशी, आदम तांबोळी,चैतन्य कुवर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते,