पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयाचा गणपती बाप्पाला निरोप
अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बु. (ता.शिरूर) येथील डॉक्टर पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयामध्ये गणेशोत्सवाची सातव्या दिवसाची सांगता अतिशय सुंदर अशा लेझीम पथकाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य जे डी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय गुटे सर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ढोल लेजिमच्या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसेच महाआरती घेऊन अतिशय शिस्तबद्ध व शांततेत गणरायाचे विसर्जन करत निरोप दिल्याचे मुख्याध्यापक पवार सर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी परिक्रमा शैक्षणिक संकुलचे उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे ,शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अंकुश नागवडे, उपाध्यक्ष मनोहर मचाले, माजी अध्यक्ष रमेश पाटोळे ,सरपंच दिपाली नागवडे ,महेंद्र नागवडे ,अजित पाटोळे ,अजित गवळी,तसेच माजी विद्यार्थी आदी बहुसंख्येने ग्रामस्थ व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊन महाआरती करून अतिशय शिस्तबद्ध व शांततेत गणरायाचे विसर्जन करत निरोप दिला विद्यालयात वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते तसेच सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे मुख्याध्यापक पवार सर यांनी आभार मानले.