सभासदांना भारतीय डाक विभागाच्या वतीने पाच लाखाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय
लोणीकंद( ता. हवेली) सोमेश्वर संस्था समूहाची वार्षिक सर्वसाधारण सन २०२३-२४ वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा विद्याधर कंद यांच्या अध्यक्षतेखाली गोल्डन पॅलेस, पुणे नगर रोड, टोलनाक्याजवळ रविवारी १ सष्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सभेची सुरुवात दीप प्रज्वलन, गणेश प्रतिमा पूजन तसेच शिव छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली तत्पूर्वी देशपातळीवरील शहीद झालेले जवान तसेच सभासदांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती पंचतत्वात विलीन झाल्या त्यांच्या स्मूर्तीस अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण करुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन संजय कंद, व्हा चेअरमन रामदास ढगे, माजी सभापती नारायणराव कंद, सर्व संचालक, लोणीकंद सरपंच उपसरपंच ग्रा सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी व सर्व संस्थाचे सभासद, आजी माजी पदाधिकारी कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती महिला पतसंस्था, सोमेश्वर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, सोमेश्वर दुध उत्पादक सेवा संघ भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटी संस्थेने जे कामकाज केले त्याचा संपूर्ण अहवाल उपस्थित सभासदांसमोर यावेळी मांडण्यात आला तसेच सर्व संस्थेच्या सभासदांना भारतीय डाक विभागाच्या वतीने पाच लाखाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला
सभासदांनी सर्व संचालकांचे यावेळी अभिनंदन केले, तसेच सभेचे इतिवृत्त यांनी वाचन केले तर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पूजा प्रदीप कंद यांनी वार्षिक अहवालाचे वाचन तसेच वार्षिक नफा आणि तोटा याचे वाचण केले, तर सभेचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच गजानन कंद यांनी करत सभेची सांगता आभाराने व अल्पोपहार याने करण्यात आली.संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच संस्थेच्या पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.