बाभुळसर बू!गावच्या आदर्श सरपंच दिपाली नागवडे यांनी भरवला मुख्यमंत्री वयोश्री कॅम्प

शिरूर तालुक्यातील बाभुळसर बू! मध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ६५ वर्ष पूर्ण व्यक्तीस एका वेळेस शासनामार्फत ३००० रुपये मिळणार असून या योजनांचे भव्य असा कॅम्प सोमवार दि.३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर या दोन दिवशी भरविला आणि स्वतः जातीने लक्ष घालून गावच्या आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे तसेच मांडवगण फराटा सरकारी डॉक्टर सांगळे,गावातील आशासेविका रुक्साना अल्वी,राधिका रणदिवे, कुदळे मॅडम यांनी फॉर्म भरून घेतले.यावेळी ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.सरपंच गणेश मचाले, सरकारी डॉक्टर फाटले, कविता पाटोळे ग्रामपंचायत सदस्या, मा.उपसरपंच सुनील देशवंत, संत तुकाराम सोसायटी संचालक रामदास नेते नागवडे, रामराव पाटील, महेंद्र नागवडे युवा नेते राष्ट्रवादी, सुभाष नाना नागवडे, हरिभाऊ नागवडे श्री.दत्त पतसंस्था चेअरमन, सोमनाथ नागवडे, बाळासो शंकर नागवडे, बाभुळसर विकास सोसायटी संचालक मच्छिंद्र राऊत,नामदेव कुंडलिक नागवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी बोलताना सरपंच नागवडे यांनी सांगितले की महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येक व्यक्तीला काहीना काही लाभ दिला आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, साठ वर्षां पुढील वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना बस मध्ये ५०% तिकिटामध्ये सूट असे अनेक लाभ या महायुतीच्या शासनाने दिलेले आहेत. बाभुळसर ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या योजनेचे सर्व प्रकारचे कॅम्प भरून गावातील प्रत्येक व्यक्तीला सर्व योजनेचा लाभ देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. यावेळी सर्वांचे आभार महेंद्र नागवडे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें