लोणीकंद पोलीसांनी गुन्हेगारी टोळीच्या आवळल्या मुसक्या

लोणीकंद (ता हवेली) सराईत गुन्हेगार टोळी कडुन देशी बनावटीचे सात पिस्टल व तेवीस जिवंत काडतुसे, दोन वाहने, सात मोबाईल फोन असा एकूण ९,१४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून लोणीकंद तपास पथकाने  सात आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार २९ ऑगस्ट २४ रोजी सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम संपवुन फिर्यादी व साक्षिदार  हडपसर, मांजरी मार्गे कोलवडी येथे घरी जात असताना पुर्व वैमनस्याच्या भांडणातून रस्त्यात अडवून आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार हिम्मत जाधव, पोलीस उपआयुक्त सोो, परिमंडळ ४ पुणे शहर, व प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सो येरवडा विभाग, पुणे शहर यांनी पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना सदरचा गुन्हाचा तपास करण्याच्या सुचना केल्या त्यानुसार पंडीत रेजितवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेणेकरिता सासवड, हडपसर, कोंढवा, कात्रज परिसरात एक पथक तसेच चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात दुसरे पथक रवाना करण्यात आले.

पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, दिपक कोकरे यांचे पथकाने केलेल्या तपासात नमुद दाखल गुन्हा हा हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांनी केला असल्याचे गोपणीय बातमीदारा कडून माहिती मिळाली त्यानुसार तपास पथकाने हडपसर भेकराईनगर परिसरात एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांची माहिती प्राप्त करून नवले ब्रिज कात्रज परिसरात सापळा लावुन आरोपी अमीत म्हस्कु अवचरे, अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, लतिकेश गौतम पोळ, राज बसवराज स्वामी यांना ताब्यात घेण्यात आले व कसुन चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासा दरम्यान आरोपी अमीत अवचरे व सागर हेगडे यांचे ताब्यातुन देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची एकुण ०५ दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडुन देशी बनावटीचे ०४ पिस्टल व १२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे दाखल गुन्हयाचे तपासात ०७ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन देशी बनावटीचे एकुण ०७ पिस्टल व एकुण २३ जिवंत काडतुसे, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, ०७ मोबाईल फोन असा एकुण ९,१४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, हिम्मत जाधव साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे साो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पंडीत रेजितवाड सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, सुधीर शिवले लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें