अल्लाउद्दीन अलवी( प्रतिनिधी)
ता ३ बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे येथे गावातील मारुती मंदिराला वज्रलेप करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष धोंडीबा नागवडे यांनी वज्रलेप करण्यासाठी ७०००० रूपये देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा संत तुकाराम वि.का.सेवा सह संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप बापू नागवडे, हनुमंत भाऊ पाटोळे उपाध्यक्ष परिक्रमा संकुल काष्टी,सचिन बापू मचाले जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा, संत तुकाराम संस्थेचे माजी चेअरमन सुनील दादा नागवडे, संत तुकाराम संस्थेचे चेअरमन मनोहर मचाले, उपाध्यक्ष संजय नागवडे ,मारूती नागवडे,सुनील नागवडे, संतोष नागवडे उपाध्यक्ष श्री दत्त पतसंस्था, राजेंद्र व्यंकटराव नागवडे मा चेअरमन, संचालक शरद नागवडे, सचिव विजय नागवडे ,जाकीर सय्यद आदी उपस्थित होते. सर्वाच्या वतीने दिलीप बापू यांनी सुभाष नाना नागवडे यांच्या दानशूरपणामुळे मारुती मुर्ती व पांडूरंग रूक्मिणी मुर्ती वज्रलेप साठी ७०००० दिलेबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नागवडे यांनी केले व आभार सचिव विजय नागवडे यांनी मानले.