लोकराज्य पक्षाच्या सुयोग्य उमेदवाराला निवडून द्या; अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे

भारतीय लोकशाही सुदृढ, बळकट होईल, राष्ट्रासाठी काळाची गरज

छत्रपती संभाजीनगर ; येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत ५० विधानसभा मतदारसंघात लोकराज्य पक्षातर्फे उमेदवार उभे करणार असून त्यासाठी आदिवासी” कोळी महादेव, कोळी मल्हार, डोंगर कोळी, कोळी ढोर वा टोकरे कोळी या अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींची समाज बांधवांनी मतदान करून आपल्या उमेदवारास निवडून द्यावे असे लोकराज्य पक्षाचे अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे व महासचिव किशोर दिवेकर यांनी आव्हान केले आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ५० विधानसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींचे संख्याबळ अधीक आहे अश्या निवडक २० ते २५ सुयोग्य उमेदवार उभे करणार असून आपल्या संपुर्ण समाज बांधवांनी लोकशाहीप्रती संविधानास पोषक व पुरक लोकाभिमुख विचारसरणी असलेले आणि राष्ट्रहितासाठी धोरणात्मक निर्णयांचा धाडसाने पाठपुरावा करू शकतील असे धाडसी उमेदवार निवडून घ्यावे ही राष्ट्रासाठी काळाची गरज आहे म्हणून आपल्या समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातील संपुर्ण बांधवांनी सामंजस्याने संघटीतपणे निर्णय घेऊन एकच उमेदवार उभा करून निवडून आणणे, ही आपली सर्वांचीच सामुहीक जबाबदारी आहे. किमान २० ते २५ आमदार निवडून विधानसभेत पाठवलेच पाहीजेत. यापुढे आपले बहूमोल मत देतांना “भारतीय लोकशाही सुदृढ व बळकट होण्यासाठी संविधानाच्या ध्येय, धोरणे, उद्देश आणि प्रस्तावनेचे काटेकोरपणे पालन करीत समाजाभिमुख कार्य करीत असलेल्या सुयोग्य उमेदवारांचाच आपण विचार करून निवडून घ्यावे असे आवाहन लोकराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें