औंध जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे बांधकाम पुणे जिल्हा परिषद दिव्यांग निधी मधून सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी जेवढे टेंडर दिले होते त्यापेक्षा जास्त काम ठेकेदारांनी केले. दुसऱ्या कामाचे टेंडर त्याच ठेकेदाराला देण्याचा घाट ही जिल्हा परिषदेने घातला आहे
या विरोधात प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करून एक कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील दिव्यांगांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना घेराव घालत आंदोलन केले.
बांधकामाची सखोल चौकशी करण्यात ऐईल. येथून पुढे संबंधित ठेकेदाराला पुढील हप्ता देण्यात येणार नाही असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तीन तास झाले तरीही आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगानी जिल्हा परिषदेचा ताबा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षा बाहेर ठिय्या मांडला.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर जिल्हा उपाध्यक्ष किसान भांगे, सुरेश जगताप, गोविंद कुतळ विजय तांबे,तालुका अध्यक्ष अनंतरावं गायकवाड, बापू कुडले, नामदेव वालगुडे, सुरेश पाटील, अनिल फरगडे., फिरोज पठाण, जीवन टोपे, मच्छिन्द्र शिंदे. सुनील दरेकर. बाळासाहेब काळभोर, समीर टावरे, दिव्या ढमे, सूक्षला ढाणे, शोभा ज्योती हिवरे. मृत्युंजय सावंत. दादा डमे .कारभारी चौधरी. कुंडलिक वायकुळे. वंदना शिंतोडे. मनीषा गायकवाड. भास्कर गवारे. नारायण नवले. रामदास चव्हाण. इत्यादी दिव्यांग बांधव याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य सी ई ओ यांनी आश्वासन दिल्यानंतर आणि इतर मागण्याबाबत सकारात्मक निर्णय दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
.