हवेली, ता. २९ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार यांचा आज वाढदिवस आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हवेली तालुक्यात पोस्टर वाॅर सुरू झाले आहे. या निमित्ताने हवेली तालुक्यातील लोणीकंद मध्ये समर्थकांनी फ्लेक्स झळकवले आहेत. अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या काही फ्लेक्स वर त्यांचा “मंत्री महोदय” असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हे फ्लेक्स आणि अशोक पवार यांचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार अशोक पवार यांचा आज वाढदिवस आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो धुमधडाक्यात साजरा होत आहे. अनेक समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुकाभर फ्लेक्स झळकवले आहेत. अशोक पवार पुन्हा आमदार झाले की मंत्रीपद मिळणार हा शिरूर हवेलीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या फ्लेक्समुळे तो पुन्हा चर्चेत आला. लोकसभा निवडणुकीमुळे शिरूर हवेलीची बरीच राजकीय गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिरूर हवेली मधील राजकीय गणित शरद पवार कोणत्या दिशेने नेणार अशी चर्चा रंगली आहे.
तालुक्यातील कार्यसम्राट उभरते नेतृत्व असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवार यांना जनतेने महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिरूर हवेलीला अशोक पवार यांच्या रुपाने मंत्रीपद मिळणार असल्याचा शब्द शरद पवारांनी भर सभेद दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हवेलीत अष्टापूर येथे झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत सांगितले.
[ रस्त्याची वाहतूक कोंडी, तसेच नागरीकांना शैक्षणिक, आरोग्य व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत धडपड सुरू असते. तसेच आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती, प्रलंबित कामे, प्रकरणे, कर्जमाफी, अतिवृष्टी इत्यादी नागरीकांच्या समस्या सोडविल्या आहेत :-विजय वाळूंज, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस]
महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, समाजातील मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेऊन त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्यांविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम आमदार अशोक पवार यांनी वेळोवेळी केलं आहे. पत्नी सुजाता पवार या अशोक पवार यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यात नेहमीच अग्रेसर असतात पक्ष फुटी वेळी सगळी प्रलोभने दिली गेली परंतु अशोक पवारांनी आपली निष्ठा ढळू दिली नाही :- सोमनाथ देवदत्त कंद उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरद पवार गट