तिरंगा स्नेहबंध नुर शेख यांना प्रदान करताना धर्मगुरु ज्ञानी प्रताप सिंग व धर्मगुरु रझिन आश्रफ तसेच मान्यवर(छाया संदिप डोके हडपसर)
हडपसर दि ४ प्रतिनिधी संदिप डोके
अखिल नागरीक एकता मंच कोंढवा पुणे यांच्या वतिने सन २०२३ चा तिरंगा स्नेहबंध पुरस्कार सामाजिक योगदाना बद्दल नुर शेख यांना दिला त्या प्रसंगी ते बोलत होते धर्मगुरु ज्ञानी प्रताप सिंग व धर्मगुरु रझिन आश्रफ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
त्याप्रसंगी भन्ते बुध्द दिलिप कांबळे,कारी यजदानी ,विविध सामाजिक संस्था , समाजातिल १४ विविध संंस्था मंडळांच्या वतिने पुरस्काराचे आयोजन केले होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना मनी बाळगुन निस्वार्थीपणे आजवर काम करत आलो असुन सामाजिक योगदाना मुळे मला मिळालेल्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असुन चांगले काम करणार्यांची दखल घेणारे समाजात आहे असे मत हडपसर विधानसभा मतदार संघाचे कोंढव्याचे प्रभागप्रमुख नुरभाई शेख यांनी व्यक्त केले.
नुर शेख यांना सामाजिक योगदाना बद्दल तिरंगा स्नेहबंध पुरस्कार मिळाल्याने सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.