कोंढवा येथे देव दर्शनासाठी जाणार्या भाविकांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेविक आरती बाबर व उपस्थित मान्यवर(छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.४ (प्रतिनिधी) संदीप डोके
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रावण महिन्यानिम्मित कोंढवा भागातील ३००० नागरिकांना त्रंबकेश्वर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती.यात्रेचा शुभारंभ ग्रामदैवत भैरवनाथाच्या आरती पुणे शहरातील पक्षाच्या विभाग अध्यक्षाच्या शुभहस्ते करून करण्यात आली. नवनिर्माण देवदर्शन समिती कोंढवा यांच्या वतिने दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
नेहमीच विविध ठिकाणी कोंढवा भागातील नागरिकांना यात्रा घडविण्याचं पुण्य मला मिळते.उत्फूर्त असा नागरिकांनाचा प्रतिसाद,आशीर्वाद आणि प्रेम यामुळे जनसेवेसाठी अधिक ऊर्जा मिळते.असे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगीतले.
त्याप्रसंगी माजी नगरसेविका आरती बाबर,मनसे शहर महिला उपाध्यक्ष सुप्रिया सतिश शिंदे,देवदर्शन समिती अध्यक्ष शेखर लोणकर,अमोल शिरस,सतिश शिंदे,गणेश बाबर,रुपेश बाबर आदी सह स्थानिक नागरीक उपस्थित होते.