बाभुळसर !बु ! ता.शिरूर : येथे आज (दि.४ रोजी ) सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे तसेच सर्व युवक आणि ग्रामस्थ बाभुळसर बु!यांच्या आव्हानाला साथ देत, जालना येथील सराटी गावामध्ये झालेल्या मराठी क्रांती मोर्चा यांच्या वतीने शांततेत चालू असणाऱ्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्याच्या विरोधात गाव बंद ठेऊन निषेध सभा आणि गाव फेरी काडून ग्रामस्थांना आंदोलनात सहभागी होण्यास आश्र्वासित केले.
यावेळी गावातील मोठ्या संख्येने युवक,पदाधिकारी उपस्थित होते,गावातील ग्रामपंचायत,सोसायटी,किराणा ,पशुखाद्य दुकाने बंद ठेऊन व्यापारी वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी निषेध संबोधत करताना सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सभेस संबोधित करताना म्हणाल्या सर्व पक्षांचे सरकार सत्तेवर आले परंतु कोणीच मराठा समाजाला न्याय मिळवून दिला नाही त्यामुळे आपणच सर्वांना पक्षभेद विसरून एकत्र येऊन न्यायासाठी मोठा लढा उभा केला पाहिजे तरच आपल्या समाजाला न्याय मिळेल.यावेळी प्रशांत नागवडे,अमित चांदगुडे,दिलीप बापू नागवडे,हरिभाऊ नागवडे सभेस संबोधित केले,आभार अमित बाळासो नागवडे यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत गावचे ज्येष्ठ रामराव पाटील, प्रगतशील शेतकरी संतोष टेकवडे,ग्रामपंचायत सदस्य निरंजन नागवडे, सोमनाथ नागवडे,मा.ग्रामपंचायत सदस्य बबन काका नागवडे,श्रीराम सोसायटी चेअरमन किशोर नागवडे,संत तुकाराम सोसायटी संचालक अमोल नागवडे, संत तुकाराम सोसायटी संचालक मनोज मचाले,बाळासो थोरात,नितीन आप्पा नागवडे, मा.ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, बाभुळसर सोसायटी संचालक विलास गवळी,राष्ट्रवादी शिरूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सतीश नागवडे,संपत नागवडे,सामाजिक कार्यकर्ते अजित गवळी, शिवभक्त लक्ष्मण टेकवडे,निलेश नागवडे, युवक कार्यकर्ते रविराज नागवडे,अजित पाटोळे,अक्षय नागवडे,आकाश नागवडे,सुमित नागवडे,सुमित नागवडे,सागर नागवडे,सुमित नामदेव नागवडे, गोटु थोरात आदी ग्रामस्थ,युवक, उपस्थितांकडून गाव फेरी व निषेध सभा शांततेत पार पडल्याची माहिती महेंद्र नागावडे यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.