वाघोली प्रतिनिधी: शेखर पाटील
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ वाघोली येथे रविवारी दि.३ सप्टेंबर रोजी पुणे- नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज वाघोली यांच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यानंतर पुतळ्यापासून गावामध्ये रॅली काढण्यात आली, त्यानंतर गावाच्या मुख्य वेशीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रशासना विरोधात तीव्र घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.