Home महाराष्ट्र हवेलीत तालुकास्तरीय शिक्षण गुणवत्ता कक्ष समिती सदस्यपदी विजय कंद

हवेलीत तालुकास्तरीय शिक्षण गुणवत्ता कक्ष समिती सदस्यपदी विजय कंद

0
हवेलीत तालुकास्तरीय शिक्षण गुणवत्ता कक्ष समिती सदस्यपदी विजय कंद

    ता. हवेली : पंचायत समिती, हवेली गटशिक्षणाधिकारी यांचे सूचनेनुसार लोणीकंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कंद यांची हवेली तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष समिती सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली.

 

यावेळी लोणीकंद शाळेत पुणे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष व  पीडीसीसी बँकचे विद्यमान संचालक प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पूजा कंद, लोणीकंद ग्रामपंचायत सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहुल शिंदे, सदस्य अतुल मगर व सर्व सदस्य ,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व उपाध्यक्ष  गोपीनाथ कंद, भाजपा आघाडी भाऊसाहेब झुरुंगे, किरण होले, शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ शिंदे व सर्व शिक्षक वृंद आदी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

 

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली तालुकास्तरीय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शासन निर्णयनुसार क्र. २०२३ / प्र.क्र.३०/ एसडी – ६ दिनांक १० मे २०२३ अन्वये महाराष्ट्र शासन निर्णयानुसार व डायट पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार सर्व केंद्र प्रमुख व पंचायत समिती, हवेली गटशिक्षणाधिकारी यांचे सूचनेनुसार हवेली तालुकास्तरीय गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष स्थानी भूषण जोशी (गटविकास अधिकारी) यांची निवड केली तर निलिमा म्हेत्रे (गटशिक्षणाधिकारी) यांची सदस्य सचिव, तर सदस्य म्हणून प्राची पाटील (अधिव्याख्याता, डायट पुणे), अक्षदा शिंदे (बाल विकास प्रकल्प अधिकारी), ज्ञानदेव खोसे (विस्ताराधिकारी शिक्षण), अशोक गोडसे ( विस्ताराधिकारी शिक्षण), रंजना कड (विस्ताराधिकारी शिक्षण), आशा बांगर (विस्ताराधिकारी शिक्षण), सोमनाथ शिवले ( विषय साधनव्यक्ती), गोपाळ शिवशरण (विशेष साधनव्यक्ती), राजेंद्र जगताप (केंद्रप्रमुख, लोणी काळभोर), चिंतामण अद्वैत (केंद्रप्रमुख, शिंदवणे), शब्बीर शेख (केंद्रप्रमुख, कुंजीरवाडी ), शेषराव राठोड (केंद्रप्रमुख, अष्टापूर), अंकुश बढे (केंद्रप्रमुख, पेरणे), गोरखनाथ ओगले (मुख्या., प्राथ. जि. प. प्रा. शाळा, कुंजीरवाडी), संतोष भंडारी (मुख्या., माध्य. भारतीय जैन संघटना, वाघोली), भारत भोसले (मुख्या., उच्च माध्य. महात्मा गांधी विद्यालय ऊरुळी कांचन), स्वाती शिंदे (प्राथ. शिक्षक, जि. प. प्रा. शाळा, खानापूर ), राहुल गाट (माध्य. शिक्षक, पृथ्वीराज कपूर हाय. लोणी काळभोर), सुहास पवार ( उच्च माध्य. शिक्षक, श्री संत तुकाराम माध्य. व उच्च माध्य. विद्या. लोहगाव), विजय कंद ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, जि. प. प्रा. शाळा लोणीकंद), गोरखनाथ मते (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, जि. प. प्रा. शाळा खडकवासला ) या २३ सदस्यांची तर त्यापैकी एक अध्यक्ष, एक सचिव अशी निवड करण्यात आली.

या समितीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्याशी समन्वय साधून शाळाबाहय विद्यार्थ्यांसह १०० टक्के विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी उपस्थिती टिकवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे याबाबत आराखडा तयार करणे.दिव्यांग विद्यार्थी १०० टक्के शाळेत दाखल करुन त्यांचे योग्यरित्या शिक्षण प्रक्रियेत समावेशन होण्यासाठी विविध संस्था व संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांना निर्देश देणार असल्याची माहिती विजय कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला सांगितली.