लोणीकंद:(वार्ताहर)
पुणे (ता. हवेली) : लोणीकंद पोलीस ठाणे हददीतील तुळापुर येथे: दि. २७/०८/२०२३ रोजी भर दिवसा घराचा कडी कोयंडा उचकटून दोन तोळे १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा रजिस्टर नंबर ६९१ / २०२३ भादंवि कलम ४५४,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कोईगडे यांनी तत्काळ तपासी पथक अधिकारी तपासी पथक अधिकारी सपोनि गोडसे, यांचे नेतृत्वाखाली तपास पथक तयार करुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता योग्य त्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे तपास पथकातील सपोनि गोडसे व पो. शि. रोकडे, पो शि चव्हाण, पो. शि सपुरे,पो. शि कोकरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन अज्ञात आरोपीने केलेल्या गुन्हयाची पध्दत नुकतेच जेलमधुन सुटलेले आरोपीं तसेच गोपनीय खब-यामार्फत माहिती प्राप्त केली असता सदरचा गुन्हा हा सचिन साधु एखंडे, वय ३३ वर्षे रा. कुंजीरवाडी, हा हडपसर, पुणे याने केला असलेबाबत बातमी प्राप्त झाल्याने त्याचा शोध घेत असताना नमुद इसम हा त्याचे मुळ गावी उस्मानाबाद येथे पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्यास सापळा रचुन वर नमुद पथकामार्फत शिताफीने ताब्यात घेवुन त्यास दि. ३०/०८/२०२३ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आले.
तपासात आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास करुन नमुद गुन्हयातील फिर्यादी यांचे २ तोळे ०१ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, व गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची मोटार सायकल, एकुण किं रु.०१,५५,०००/- अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत असल्याची माहिती विश्वजीत कोईगडे यांनी दिली
सदरची कामगिरी मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. शशीकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. संजय पाटील साो, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली श्री विश्वजीत काइंगडे साो,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे),श्रीमती सिमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस नाईक सागर जगताप, पोलीस नाईक साळुंके, पोलीस शिपाई साई रोकडे, सचिन चव्हाण, दिपक कोकरे, मल्हारी सपुरे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.