माहिती सेवा समितीच्या महिला अध्यक्षा भारती कामठे यांच्या संकल्पनेतून येवलेवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

 

लोणीकंद:( वार्ताहर)

ता.हवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी येथे अखिल भारतीय माहिती सेवा समिती पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.भारती रोहिदास कामठे यांच्या संकल्पनेतून भारती आयुर्वेद हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने दि.२९/०८/२०२३ रोजी गावातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी आयोजक भारती कामठे, ह भ प पोकळे आबा, ह.भ.प.संदीप दांडेकर ,सोमनाथ कामठे शाळेतील शिक्षकवृंद बहुसंख्य पालक आदी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.

या तपासणी मध्ये सर्दी, खोकला, कान, नाक, डोळे,पोटाचे आजार इत्यादी तपासण्या करून विद्यार्थ्यांना औषधे देण्यात आली. एकूण ४७५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली

पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे रोग पसरत असतात सध्या डोळे येणे ही सात मोठ्या प्रमाणात पसरत आहे यामुळे मुलांच्या आरोग्य खालावत आहे त्यात येवलेवाडी गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन पंधरा वर्षे झाली परंतु ही शाळा जिल्हा परिषदे कडून महानगरपालिकेकडे समाविष्ट केलेली नाही त्यामुळे या शाळेमधील मुलांना ज्या सुख सुविधा मिळायला हव्या आहेत त्या मुलांना मिळत नाही जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका यामध्ये शाळा अडकल्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे अध्यक्षा भारती कामठे यांनी “शिरूर हवेली न्यूज”शी बोलताना सांगितले.

 

 

 

 

 

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें