व्यापारी संघाचे शिरूर तालुक्यात मेळ्याव्याचे आयोजन

मांडवगण फराटा,( ता. शिरूर); शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे प्रथमच रिटेल व्यापारी संघाचे मार्गदर्शन मेळाव्याचे सोमवार दि. २९ जुलै रोजी आयोजन केल्याचे मांडवगण फराटा येथील बैठकीत व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असताना कॉन्फरडेशन ऑल ऑफ इंडिया ट्रेडर्स कॅट, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघाचे संस्थापक, अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी जाहीर केले.

शिरूर तालुक्यातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या शिक्रापूर, पाबळ, रांजणगाव गणपती , शिरूर, न्हावरे, तसेच मांडवगण फराटा या गावांना सचिन निवंगुणे यांनी भेट दौरा केला, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ हा महाराष्ट्र कॅटची संलग्न असून २५ मे जागतिक व्यापारी दिन कायम पुणे शहरात साजरा करतो, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आयोजन करणार आहे यावेळी सचिन निवंगुणे यांनी सांगितले

यावेळी शिरूर तालुका अध्यक्ष किरण शिंदे, कार्याध्यक्ष हरीमामा फराटे, तालुका उपाध्यक्ष अशोक शहाणे, तालुका सरचिटणीस लधाराम पटेल, बाळासाहेब चौधरी, गणेश जगताप, विजय फराटे, राहुल सुराणा, रमेश पाटुकले, भालचंद रंधवे, काळूराम शर्मा, बाळासाहेब मांढरे, यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

तालुक्यातील लहान बाजारपेठा तसंच छोटे व्यापारी टिकले पाहीजेत तसेच त्यांचा व्यवसाय वाढला पाहीजे, व्यापारी वर्गाला आर्थिक व शासकीय विभागाकडून संरक्षण मिळाले पाहीजे, व्यवसायातील कायदेशीर मार्गदर्शन मिळाले पाहीजे, ऑनलाईन व्यवसाय /नेटवर्किंग बिजनेस/ शेअरिंग बिजनेस/ ऑट्सअप बिजनेस एज्युकेशन/ फायनान्सियल सपोर्ट /प्रोजेक्ट फाईल /ऑनलाईन फसवणूक/सायबर क्राइम या संदर्भात मार्गदर्शन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यासाठी स्वतःच्या व पुढील पिढीसाठी व्यापारी संघटनेत सामील होण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवंगुणे यांनी केले आहे

युवा उद्योजक घडला पाहीजे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन सहकार्य आपण केले पाहीजे यासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे तालुका अध्यक्ष किरण शिंदे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले तर व्यापारी वर्गाला संरक्षण देणे त्यांना सक्षम करून त्यांना कायद्याची योग्य मार्गदर्शन करणे अतिशय आवश्यक आहे यासाठी जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे उपाध्यक्ष अशोक शहाणे यांनी मत व्यक्त केले यावेळी बाळासाहेब चौधरी यांनी सर्वांचे स्वागत सत्कार केले तर हरीमामा फराटे यांनी आभार व्यक्त केले

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें