लोणीकंद (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रोडवरील माऊली वजन काट्या जवळ पायी चाललेल्या व्यक्तीस पाठीमागून कंटेनरची व समोरून डंपरची धडक बसून अपघाती मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दि.११ रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली, लक्ष्मण रतिलाल कोल वय ४५, रा. भीमासहकारी पोल्ट्री फार्म,आळंदी रोड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सदरील व्यक्ती सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी पायी चालताना आळंदी रोडवरील वजन काट्या समोर कंटेनर पाठीमागून धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले, व समोरून येणाऱ्या डंपरनेही धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अक्षयकुमार कोंल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार पोलीसांनी रतिलाल कोल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.