सिनेक्रोन टेक्नॉलॉजी कंपनी कडून शाळेंना संगणक वाटप

जुन्नर, उच्छिल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व रूपश्री महिला विकास संस्था यांच्या वतीने वेगवेगळ्या शाळेंना चौदा संगणक संचाचे वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी दिली आहे.

उच्छिल ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व रूपश्री महिला विकास संस्था यांच्या वतीने अध्यक्षा अश्विनी नवले व गोरक्ष नवले यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील उच्छिल, शिवली, चावंड, खडकुंबे, उसरान, बांबळेवाडी, चिंचोली मराठी व काले या शाळांना चौदा संगणक संचाचे वाटप सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रफिक नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे, सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक रवी गोळे, प्रियंका शिंदे, प्राजक्ता माने, चिंचोलीचे सरपंचचक खंडू काशिद, उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, स्मिता ढोबळे, आरती मोहरे, शांताबाई नवले, सुरेखा बोचरे, मनिषा भोर, ज्ञानदेव जोशी, तुकाराम भालेकर, युवराज मोहरे, मनिषा काशिद, माया शेळकंदे, धनश्री अभंग, रोहिणी गडदे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांची सहल आय. टी. पार्कला घेऊन जाऊन त्यामधून निश्चितच मुलांचे भविष्य उज्वल होईल व संगणक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल अशी अपेक्षा रफिक नदाफ यांनी व्यक्त केली. दरम्यान शिक्षण विस्ताराधिकारी संचिता अभंग यांनी भविष्यात आदिवासी भागातील मुलांकरीता असंख्य साहित्य द्यावेत अशी मागणी करत शाळेतील परसबागेची पाहणी केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी केले तर प्रास्ताविक उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले आणि लिलावती नांगरे यांनी आभार मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें