हवेली; आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात शिरूर हवेली मतदासंघात राजकारण तापायला सुरूवात झाल्याने महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या गटाकडून व इच्छूक उमेदवारांनी जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अधिक चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
शिरूर हवेली विधानसभेसाठी महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार अशोक पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे महायुतीला खूप मोठे आव्हान असणार आहे त्यामुळे अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून अनेक जण इच्छुक आहेत परंतु एकमेव भाजपमधील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद हा तगडा उमेदवार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे, कारण राजकारणामध्ये अष्टपैलू, रोख ठोक नेतृत्व म्हणून प्रदिपदादांकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना संधी मिळणार हे निश्चित त्यामुळे महायुतीकडून शिरूर हवेली विधानसभेची जागा भाजपाला सुटणार हे मात्र निश्चित असल्याने त्या दृष्टीने भाजप पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे तर कार्यकर्त्यांनी शिरूर मतदार संघात फिरून मतदार राजांच्या भेटी गाठी घेऊन संपर्क वाढविणे सुरु केले आहे .