मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी फॉर्म भरण्यास महिला भगिनींचा उस्फूर्त प्रतिसाद  

हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचे आयोजन करण्यात आले होते, या योजनेसाठी फॉर्म भरण्यास महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यास आलेल्या महिलांचे यावेळी सरपंच मोनिका कंद, उपसरपंच राहुल शिंदे, ग्रा.सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी फॉर्म भरून घेतले.

राज्यशासनाच्या या योजनेमुळे महिला वर्गाला याचा लाभ होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेमुळे फॉर्म भरण्यास आलेल्या सर्व महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. तसेच मी एक महिला सरपंच तसेच महिला भगिनींच्या तर्फे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन करते, असे सरपंच मोनिका कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें