शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण शंकर भोर तर प्रतिक्षा ऋषीकेश लोहोट यांची उपाध्यक्षपदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान नप्ते यांनी जाहीर केले.
यावेळी मावळते अध्यक्ष समाधान भोरडे, दत्तात्रय चौधरी, बाळासाहेब लोहोट, प्रकाश वाजे, सचिन वाजे, सागर सोनवणे, राजेश भोर, विवेक तिखे आदी मान्यवर, पालक उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण भोर व प्रतीक्षा लोहोट यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तर शाळेची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा ,आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी इमारती बाबत काही अडचणी व इतर सुविधा देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण भोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब फुंदे यांनी केले तर आभार सागर सोनवणे यांनी मानले.
निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस अमीत सोनवणे, उद्योजक माऊली चौधरी, ग्रा. सदस्य संजय भोर, राहूल सोनवणे, मनोज सोनवणे, जगदिश तिखे, देवा भोर, मच्छिंद्र तिखे, गणेश लोहोट, अवधुत शिंदे, मंगेश शिंदे, श्रावण खराबे, राजू भोर, संतोष गोसावी, गणेश भोंडवे, कमलेश बेंडभर, आकाश लोहोट, दत्ता पावशे, प्रमोद शेळके, भुषण खराबे, किरण पावशे, दयानंद भोर, किसन वाजे, हरीभाऊ वाजे, निलेश वाजे, हंबीर वाजे, प्रशांत वाजे, अजित तिखे यांच्यासह मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या.