पुणे, राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता नागरीकांना लागून राहिली आहे राज्यात बहुचर्चित असलेल्या विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात मतदासंघात राजकारण तापायला सुरूवात झाली राजकीय पक्षांनी व इच्छूक उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात मतदार राजांच्या भेटी गाठी घेऊन मोर्चेबांधणीला गती वाढविली असल्याचे दिसून येत आहे. निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधून ठेवले आहे. परंतु निवडणुक जाहीर होत नसल्यामुळे कुठल्याही पक्षाने अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. राजकीय पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करीत नसल्याचे दिसूत येत आहे, उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी प्रत्येक पक्षाने त्यांच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय-काय मोठ्या घडामोडी घडणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे येत्या काळात राज्यात पुन्हा एकदा मोठया घडामोडी घडण्याचे संकेत आहेत, येत्या काळात भाजप हा शिंदे गटाला व अजित पवार गटाला स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सांगू शकतो, अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरु आहे.