लोणीकंद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दहा एकरांवर वृक्ष लागवड

लोणीकंद (ता. हवेली) ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रदिपदादा विद्याधर कंद (संचालक पुणे जि. मध्य. सह. बँक मा अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे),व मा. नारायणराव कंद (मा. उपसभापती कृषी उत्पन्न बा. समिती हवेली) यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या गायरान परिसरात वृक्ष लागवड मोहिमेवर गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी पदाधिकारी, युवा तरुणांनी सहभाग घेवून मोहीम प्रभावी राबवण्यात आली.

वृक्षसंवर्धन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील दहा एकर गायरान जमीनीवर वड, पिंपळ, चिंच, आंबा, आवळा, कदंभ, पळस, बोर, बांबु तर फळझाडामध्ये फणस, जांबुळ, पेरु व चिक्कु, व फुलझाडांमध्ये जास्वंद, गुलाब, चाफा इत्यादी देशी प्रजातीची वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे नियोजन केले आहे.

या संपुर्ण दहा एकर क्षेत्राला संरक्षक जाळीचे काम पुर्ण झाले आहे, या सर्व झाडांना बारमाही ठिबक सिंचन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार चांगल्या वाढीसाठी अनुकूल झाडे दिर्घकाळ संवर्धन ग्रामपंचायत करणार आहे, भविष्यात लोणीकंद गाव प्रदुषण मुक्त आरोग्यवर्धक व पर्यावरण पुरक वातावरणाबरोबर ग्रामस्थांसाठी चालण्याचा व्यायामासाठी पद पथाचे नियोजन करण्यात आले आहे, लोणीकंद ग्रामपंचायतचा हा उपक्रम नक्कीच भविष्याच्या दृष्टीने नागरिकांच्या हिताचा होईल असे मत प्रदीपदादा कंद यांनी यावेळी व्यक्त केले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें