पुणे, दि.६ : महिला व बालविकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, कायदे व यशोगाथाची माहिती राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिलांना व्हावी याकरिता ७ जुलै रोजी यशदा येथे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार असून पुणे व सातारा जिल्ह्यातील बचत गटातील महिला या सत्रात आपले अनुभव कथन करणार आहेत. तसेच शासनाच्या महिला बालविकास व उद्योग विभागाच्या महिला विषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे, असेही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी कळविले आहे.