धम्म पदयाञाचे यवत येथे जोरदार स्वागत

प्रतिनिधी हरिभाऊ बळी

दौंड, ता. ६ कोरेगाव भिमा ते पंढरपूर धम्म पदयाञाचे यवत ( ता. दौंड ) येथे जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. भिक्खू संघात एकूण १०० पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू यांचाही या पदयाञेत समावेश आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पदयाञेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात असून, यवत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमनगर येथे मुक्काम विसावा घेतला. याठिकाणी फुलांचा वर्षाव करीत व हालगीच्या गजरात शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता धम्मयाञा यवत येथे दाखल झाली होती. यावेळी यवत गावचे विद्यमान सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, ग्रामपंचायत सदस्य व काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य शंकर दोरगे, कैलास दोरगे, तात्या दोरगे, दत्तात्रय दोरगे, अरविंद दोरगे, सुरज चोरगे, संजय दोरगे, अनिल गायकवाड, संतोष बडेकर, बबन गायकवाड, कृष्णाजी मोरे व यवत ग्रामस्थ यांनी धम्मयाञाचे स्वागत केले. समाज मंदिरात सामुदायिक वंदना व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यवत ग्रामस्थ यांच्या वतीने भोजनव्यवस्था तर ग्रामपंचायत यांच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सकाळी सहाच्या सुमारास धम्मयाञा पाटस येथे मुक्कामासाठी रवाना झाली. गेली अनेक वर्षापासून नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील तोडबा अभय अरण्यं या ठिकाणी वास्तव्य करून वेळोवेळी धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उर्वरित धम्म कार्याचा गाडा पुढे ओढण्याचा संकल्प असून महास्थवीर व भिक्खू संघ संघारामगिरी, तोडबा अभयारण्य यांच्या नेतृत्वाखाली धम्म याञा निघाली आहे. पंढरपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी धम्मयाञेचा समारोप होणार आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें