पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली, लोणीकंद, भावडी भागात सुमारे दीडशे पेक्षा जास्त खडी क्रेशर व खाणी सुरू आहेत त्यापैकी काही खाणी व क्रेशर बेकादेशीर आहेत राजरोसपणे येथे गौण खनिजांचे उत्खनन सुरू आहे बेकादेशीरपणे चालणाऱ्या खाणींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान याकडे पुणे महसूल विभाग कानडा डोळा करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या अनधिकृत क्रेशरकडून नेमका महसूल कोणाच्या घशात जातोय? आणि मलिदा कोण खातंय हे उघड होणं गरजेचं आहे
पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीर दगड खाणीतून उत्खनन करून परवानगी मधील अनेक नियमांचे उल्लंघन करून क्रेशर चालवल्या जात आहेत महसूल खात्याच्या डोळ्यात माती टाकत कोट्यावधी रुपयांचे महसुल बुडत असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने गौण खनिज भरारी पथक स्थापन केले परंतु जिल्हा खाण संघटनेकडून शासन, बिल्डर, सामान्य, नागरिकांना वेठीस धरून उत्पादन, मटेरियल सप्लाय बंद करून संप पुकारला तसेच प्रशासनावर राजकीय दबावतंत्र वापरून भरारी पथक रद्द केले. असून आता जिल्हा संघानेकडून मनमानी मालाचे प्रमाणापेक्षा जास्त दरपत्रक जारी केले आहे शिवाय कुठल्याही प्रकारची रॉयल्टी पावती मिळणार नाही त्यासाठी वेगळे दर आकारले जातील असे खाण व्यवसायीकांकडून सांगण्यात येते, घर बांधायचे तरी कसे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तसेच क्रेशरमधून उडणाऱ्या धुळीचा गावांना, शेतीला होणारा त्रास, वाहतूकीमुळे नागरिक त्रस्त आहेत प्रदुषणामुळे नागरीकांचा आरोग्याचाही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून उत्खनन केलेल्या जागेची ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते, या सर्वेक्षणात अधिक पटीने उत्खनन केल्याचे दिसून आले भरारी पथकाकडून मोजणी करून अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलेही कारवाई का झाली नाही.
महसूल विभागाचे रद्द केलेले भरारी पथक पुन्हा कार्यन्वीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड पुणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी निवेदनाव्दारे पुणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, भरारी पथक पुन्हा कार्यन्वीत न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात, ९ जुलै रोजी सकाळी ११. ३० वाजल्यापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे