गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यातील कोरगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली यशाची यशस्वी परंपरा कायम राखत विद्यालयातील तब्बल सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविली असल्याची माहिती विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य उषा भंडारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश गव्हाणे पाटील, तज्ञ संचालक गजानन गव्हाणे पाटील, संचालक सागर घावटे, विद्यार्थी पालक आरिफ तांबोळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे :- विराज बवले – (गुण २५८), उदय सातपुते -(गुण -२५०), तन्मय घाडगे -(गुण -२४८), सिद्धेश वाळके -(गुण २४६), वेदांगी महाजन -(गुण -२४६), वैष्णवी स्वामी -(गुण २४४) तसेच या विद्यार्थ्यांना सुरेश सातपुते व इंदुमती शेळके या दोन्ही शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापन व विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका उषा भंडारे, कुसुम बांदल तसेच शिक्षक वृंद शैलजा टाकळकर, बाबाजी सावंत, तुकाराम सातकर, सरोज सातकर, रुपाली बावकर, आशा बहिरट, जयमाला मिडगुले, चंद्रकला कुसाळे, शीतल डिके, गणेश दाते, संदीप सोनवणे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.