कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त घातला मुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांचा दुग्धाभिषेक

केसनंद ता.हवेली येथे युवासेना पुणे जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचा दुग्धाभिषेक गणेश सातव पाटील मित्र परिवार व केसनंदचे सरपंच प्रमुख हरगुडे व युवा सेना मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला .

नुकत्याच पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण तसेच ड्रग्स पार्टीवर कारवाई या दोन्ही घटनांवर ताबडतोब ॲक्शन घेऊन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी व पुण्याची संस्कृती टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे गणेश सातव मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले

सदर दुग्ध अभिषेक बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जाधव पाटील व केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे पाटील यांनी केला तमाम युवकांच्या व पुणेकरांच्या वतीने उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचे मनापासून अभिनंदन , शंभूराज देसाई यांच्या सारखा मंत्री उत्पादन शुल्क विभागाला लाभला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक आभार मानले

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें