पुणे,दि.३ दरवर्षी प्रमाणे क्षितीज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत वैद्यकिय सेवा देण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीकांत भुजबळ यांनी माध्यमांना दिली.
यावेळी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ.देवेंद्र नहार व मा. अध्यक्ष डॉ. श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भरत शितोळे, डॉ.सागर शिंदे, डॉ.विशाल पाखरे, डॉ.संदीप घाटगे, डॉ.राकेश कंद, डॉ.मनोज पाटील, डॉ.भूषण सूर्यवंशी, डॉ.प्रदीप बोडके, डॉ.रोहित पाटील, डॉ.सुदर्शन कुटे, डॉ.शिवाजी निरस, डॉ.दिग्विजय खरे सेवा देण्यासाठी उपस्थित होते.
सकाळी ७ ते ११ या वेळात असंख्य वारकऱ्यांना मोफत औषधोपचार सेवा देण्यात आली. या प्रसंगी असोसिएशनचे बहुतांश डॉक्टर्स निःस्वार्थ भावनेने वारकरी लोकांना सेवा देण्यासाठी उपस्थित राहिले, ज्यांना उपस्थित राहता नाही आले त्यांनी औषध स्वरूपात मदत केली सर्वांचे असोसिएशनच्या वतीने आभार मानले.