कोयाळी (भानोबाची) ता. खेड येथील नुकतीच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विकास साहेबराव भिवरे व उपसरपंचपदी उर्मिला मोहन कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली. अजय टेंगले यांनी सरपंच व अलका कोळेकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरपंचपदासाठी विकास भिवरे व उपसरपंच पदासाठी उर्मिला कोळेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गायकवाड व ग्रामविकास अधिकारी अनिल विघ्ने यांनी सरपंचपदी विकास भिवरे व उपसरपंचपदी उर्मिला कोळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित सरपंच विकास भिवरे आणि उपसरपंच उर्मिला कोळेकर यांचा ग्रामस्थांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून सन्मान केला तसेच खेड तालुक्याचे आमदार दिलीप आण्णा मोहिते यांनीही नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना पुष्पगुछ देऊन सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बाळासाहेब कोळेकर स तु स का संचालक मा सरपंच गोरख पोकळे मा सतिश दादा भाडळे मा गणेश कोळेकर मा अनिल दिघे अरून पोकळे भागा टेगले योगेश भिवरे नवणाथ भिवरे उपसरपंच मोहन कोळेकर मा. सरपंच पशुराम भिवरे यांंच्यासह आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कोयाळी गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच विकास भिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.